बांदा-वाफोली मार्गावर झाड कोसळले, वाहतूक ठप्प…
बांदा
बांदा-वाफोली रस्त्यावरील गणेश मंदिराच्या जवळ आज दुपारी अवजड वाहनाची धडक बसल्याने रस्त्यावर असलेले एक मोठे झाड कोसळले. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळासाठी थांबली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
झाड रस्त्यावर पडल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी काही वेळातच झाड हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. धडक बसलेल्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
