You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी

दोडामार्ग तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी

दोडामार्ग तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी;

शिवसेना दोडामार्गकडून पोलीस निरीक्षक व जिल्हा अधीक्षक यांना निवेदन सादर

दोडामार्ग | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील गांजा, मटका, दारू, ड्रग्स यांसारख्या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही दोडामार्ग तालुक्यात हे अवैध धंदे सुरूच असल्याने तरुण पिढीचा ऱ्हास होत असल्याची तीव्र भावना दोडामार्ग तालुका शिवसेना अध्यक्ष गणेश प्रसाद गवस यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात त्यांनी पोलीस दूरक्षेत्र दोडामार्गचे मा. पोलीस निरीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्याकडे निवेदन सादर करत तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गणेश गवस यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करताना त्यांनी म्हटले की,
“दोडामार्ग तालुक्यात अजूनही अनेक ठिकाणी खुलेआम गांजा, मटका, दारू व ड्रग्सचे व्यवहार सुरू आहेत. या धंद्यांमुळे तरुण पिढी अडकत चालली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करून हे अवैध व्यवहार तत्काळ बंद करावेत.”

या निवेदनावर खालील १३ शिवसैनिकांची स्वाक्षरी असून त्यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे:

1. भगवान गवस

2. ज्ञानेश्वर शेटवे

3. योगेश म्हाले

4. लक्ष्मण नाईक

5. प्रेमानंद देसाई

6. शैलेश दळवी

7. राजेंद्र निंबाळकर

8. विनायक शेटवे

9. विशांत तळवडे

10. सुनील गवस

11. अमरसिंग राणे

12. संदीप गवस

13. लाडू आईनोडकर

निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनावर अवैध धंद्यांवर कारवाईचा दबाव वाढवण्यात आला असून, स्थानिक स्तरावर या विषयावर संतापाचे वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तरुण पिढीच्या भवितव्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा