You are currently viewing सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; ठाकरे शिवसेनेचा प्रशासनाला इशारा

सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; ठाकरे शिवसेनेचा प्रशासनाला इशारा

सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; ठाकरे शिवसेनेचा प्रशासनाला इशारा

“कुत्री थेट पालिकेत सोडू” – शिवसेनेचे प्रवक्ते आशिष सुभेदार

सावंतवाडी :

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. लहान मुलांवर हल्ले करणे, पाठलाग करणे यासारखे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे संतप्त ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी नगरपालिका प्रशासनाला कडक इशारा दिला आहे.

सुभेदार म्हणाले की, “भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा ही कुत्री पकडून थेट पालिकेच्या दारात सोडली जातील.” त्यांच्या या विधानामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, नागरिकांच्या भीतीलाही वाट मोकळी झाली आहे.

शहरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून या समस्येमुळे हैराण झाले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे अपघात आणि हल्ल्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सुभेदार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नगरपालिकेने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ठाकरे शिवसेनेच्यावतीने करण्यात आली असून, अन्यथा लोकप्रतिनिधींनी थेट कृतीचा इशारा दिला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा