You are currently viewing सावंतवाडी बाजारपेठेतील उर्वरित मोठे खड्डे सिमेंट काँक्रेटने बुजवले यापुढे तरी निष्कृष्ट दर्जाची कामे नकोचं – रवी जाधव.

सावंतवाडी बाजारपेठेतील उर्वरित मोठे खड्डे सिमेंट काँक्रेटने बुजवले यापुढे तरी निष्कृष्ट दर्जाची कामे नकोचं – रवी जाधव.

सावंतवाडी बाजारपेठेतील उर्वरित मोठे खड्डे सिमेंट काँक्रेटने बुजवले यापुढे तरी निष्कृष्ट दर्जाची कामे नकोचं – रवी जाधव.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या चार दिवसापासून सावंतवाडी शहर बाजारपेठेतील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते ते आज पहाटे तीन वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. तसेच शहरात नळ कनेक्शन साठी रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे मारले जातात व नंतर त्या खड्ड्यांवर नुसती माती टाकून बुजवले जातात काहि दिवसानंतर ती माती निघून जाऊन तेथे मोठा खड्डा होतो व अशा खड्ड्यांमुळे अपघात होतो त्यावेळी विचारणे केली असता आम्ही नगरपरिषद मध्ये खड्डा मारण्याचे पैसे भरले आहेत ते काय ते पाहतील असे उत्तर दिले जाते. शहरामध्ये अनेक असे खड्डे आहे परंतु गोविंद चित्र मंदिर ते भटवाडी रस्त्यावरील ते खड्डे सुद्धा सिमेंट काँक्रेटने बुजवण्यात आले.
रस्त्यावरील खड्डे बुजवून संस्थेसाठी प्रसिद्धी मिळवणे किंवा कोणाला कमीपणा दाखवण्याचा उद्देश मुळीच नाही परंतु आम्ही सावंतवाडी हॉस्पिटल अपघात विभाग क्षेत्रामध्ये रात्रंदिवस विनामूल्य सेवा देतो.
इतर अपघातांबरोबरच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जेव्हा अपघात होतात त्यावेळी त्या अपघात ग्रस्त व्यक्तीची व त्याच्या कुटुंबाची काय अवस्था होते हे ती फार भयंकर असते सदर खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये म्हणूनच हा उपक्रम राबवण्यात आला.
सावंतवाडी नगरपरिषदेला एवढीच विनंती आहे की या यापुढे तरी निष्कृष्ट दर्जाची कामे नकोचं थोड्याफार प्रमाणात का होईना पण दर्जेदार कामे करावीत जेणेकरून नागरिक-ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व वाहनधारकांना याचा नाहक त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचे कर्तव्य व जबाबदारी येथील नगरपरिषदेची आहे असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे व उपाध्यक्ष शैलेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा