You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यापुष्प- ४० वे

श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यापुष्प- ४० वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
___________________________
श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यापुष्प- ४० वे

श्री स्वामींची भ्रमण गाथा…
__________________________
स्वामी त्या पुजाऱ्यांना म्हणाले । ठीक आहे, तिथून ते निघाले । जाताना बोलले । हे तीर्थ स्नानाजोगे राहणार नाही ।।१।।

स्वामी निघून गेले । मग सारे विपरीत घडले । त्या तीर्थात किडे पडले । हे सर्वांनी पाहिले । दुर्गंधी येऊ लागली त्या
पाण्याला ।। २।।

कोटिकुप तीर्थ क्षेत्री सर्व बिघडून गेले । पुजाऱ्यांचे उत्पन्न बुडाले । स्नास यात्रेकरू नाही आले। यावर उपाय केले, ते व्यर्थ ठरले ।। ३।।

मग सर्वांना उमजले । हे जे काही घडले । संन्यासी दुखावले गेले । आपली सर्वांच्या वर्तनाने ।।४।।

धावाधाव ,शोधाशोध सुरु झाली । तरी.स्वामी मूर्ती ना दिसली। ना कुठे भेटली । क्षेत्र-निवासी जनांना ।।५।।

शेवटी,ते सारे शृंगेरी मठी आले । मठाधिपती ना भेटले ।
जे घडले ते सविस्तर सांगितले । केली विनंती मदतीची ।।६।।

ज्ञानी मठाधिपतींनी योग-समाधी लावली । लगेच गोष्ट कळून आली । ब्रम्हांड नायक हेच संन्यासी,खात्री पटली ।
मग त्यांनी कानउघाडणी केली । क्षेत्र वासियांची ।।७।।

म्हणाले- तुमचे वर्तन शुद्ध नाही । तुमचा धन-लोभ सुटत नाही । मोह,माया,स्वार्थीपणा सुटत नाही । हेच कारण ठरले,तुमच्या या सर्वनाशाचे ।। ८ ।।

अरे, ज्यांना तुम्ही संन्यासी समजले । तुम्ही धना पायी नाही ते बोलले। अपमानित केले। त्यास दुखावले । घोर अपराध तुमचा ।।९ ।।

संन्यासी नसे ते,ब्रम्हांडनायक । रूप ते साक्षात ईश्वर जगचालक । ठेवा लक्षात एक । वर्तन सुधार करा तुम्ही ।।१०।।
*******************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे-पुणे
___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा