रत्नागिरी :
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे विविध डिप्लोमा कोर्सेस यशस्वीरित्या चालू आहेत. फॅशन डिझाईन, कॉस्मेटोलॉजी अँड सलून मॅनेजमेंट, फूड प्रॉडक्शन, ट्रॅव्हल टुरिझम अँड हॉस्पिटीलिटी तसेच इंटिरिअर डिझाईन अशा वर्षभर चालणाऱ्या कोर्सेस सोबतच संस्थेत विविध कार्यशाळा व सेमिनारही यशस्वीपणे पार पडले आहेत.
मेहंदी, ब्लॉक प्रिंटिंग, मुलांसाठी समर कॅम्प, पर्यटन क्षेत्रातील महिलांसाठी सेमिनार, हॉस्पिटीलिटी कार्यशाळा, सारी ड्रेपिंग, सेल्फ ग्रूमिंग, सॅटिन वर्क, केक मेकिंग, मोदक मेकिंग, टेरारियम वर्कशॉप यांसारख्या उपक्रमांना महिलांचा व तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
याच परंपरेत पुढे जात, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी व तरुणींकरिता विशेष दोन वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
यात 🔸*नवरात्री स्पेशल वर्कशॉप* दिनांक *15 ते 19 सप्टेंबर* रोजी(दु. 2:30 ते 5:30) होईल. यात👗 *घागरा-चोली स्टाइलिंग – नवीन जुन्या साडीपासुन घागरा चोली शिवणे.* 💍 *नवरात्रीसाठी हॅन्डमेड ज्वेलरी बनवणे*💄 *गरबा मेकअप शिकणे व टिप्स*
तर *दिनांक 20 सप्टेंबर रोजी* (दु. 1 ते 5) 🔹 *नवरात्र उपवास स्पेशल पाककला वर्कशॉप* होणार आहे. पाककला कार्यशाळेत उपवासाचे विविध 9 पदार्थ *साबुदाणा ट्रेन्गल उपवास इडली, अकॉरडियन फ्राईज, साबुदाणा सँडविच, उपवास पॉपकॉर्न, पोटॅटो स्किन फ्राईज*, आदी विविध नावीन्यपूर्ण उपवासाचे पदार्थ बनवायला शिकवले जाणार आहेत.
या कार्यशाळे साठी अत्यल्प शुल्क आकारले जाणार असून या वर्कशॉपसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. इच्छुक गृहिणी व मुलींनी सहभाग घेऊन नवरात्रीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन BKVTI इन्स्टिटयूट तर्फे करण्यात आले आहे.
