You are currently viewing “वेंगुर्ला-सातार्डा बसफेरी तात्काळ पूर्ववत करा, अन्यथा मळेवाड येथून एकही बस जाऊ देणार नाही 

“वेंगुर्ला-सातार्डा बसफेरी तात्काळ पूर्ववत करा, अन्यथा मळेवाड येथून एकही बस जाऊ देणार नाही 

“वेंगुर्ला-सातार्डा बसफेरी तात्काळ पूर्ववत करा, अन्यथा मळेवाड येथून एकही बस जाऊ देणार नाही

उपसरपंच हेमंत मराठे यांचा इशारा”

सावंतवाडी

गेल्या दोन दिवसांपासून अचानक बंद करण्यात आलेली वेंगुर्ला-सातार्डा बसफेरी तात्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा वेंगुर्ला आगारातील एकही बस मळेवाड येथून जाऊ देणार नाही, असा तीव्र इशारा मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.

वेंगुर्ला-शिरोडा-सातार्डा मार्गावर धावणारी ही बसफेरी गावातल्या वस्तीतून जात असल्याने विद्यार्थ्यांपासून नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषतः सातार्डा, साटेली, कोंडुरे, मळेवाड आणि आजगाव परिसरातील नागरिकांसाठी ही बस सकाळी वेंगुर्ला गाठण्यासाठी अत्यावश्यक आहे.

मात्र, वेंगुर्ला आगारातील अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थेमुळे आणि नियोजनातील गोंधळामुळे ही बसफेरी बंद झाली असून याचा थेट फटका विद्यार्थ्यांना व कामावर जाणाऱ्या नागरिकांना बसत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

हेमंत मराठे यांनी आगार व्यवस्थापनाला खडसावत सांगितले की, “बसफेरी पूर्ववत न झाल्यास ग्रामस्थांच्या मदतीने आंदोलन छेडले जाईल आणि मळेवाडमधून वेंगुर्ला आगाराची एकही बस सोडू दिली जाणार नाही.”

प्रतिक्रिया व्यक्त करा