You are currently viewing दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी  शिबीराच्या तारखेत बदल

दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी  शिबीराच्या तारखेत बदल

दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी  शिबीराच्या तारखेत बदल

2 ऑक्टोबर ऐवजी 27 सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथे शिबीराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, दिव्यांग विभाग व जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सर्व शासकीय शाळा व अशासकीय संस्था (NGO) यांच्यामार्फत दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये  दि. 2 ऑक्टोंबर 2025 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु 2 ऑक्टोंबर 2025 रोजी दसरा सण असल्याने या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून हे शिबीर दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सावंतवाडी येथे घेण्यात घेणार आहे.

           जिल्ह्यातील दिव्यांग मुलांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ, दिव्यांग मुलांचे आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड, युनिक डिसेबिलिटी ओळखपत्र व वैद्यकीय तपासणी अशा विविध प्रकारचे लाभ मिळणेकरीता या शिबीराचे सावंतवाडी येथे दि. 2 ऑक्टोंबर 2025 रोजी आयोजन करण्यात येणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांनी सांगितले होते. परंतु 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा सण असल्याने सदरच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून हे शिबिर दिनांक 27 सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथे घेण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संपूर्णा गुंडेवाडी तसेच तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी, कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ व दोडामार्ग येथील कार्यालयांशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग कार्यालयाचा ई-मेल आयडी dlsa-sindhu@bhc.gov.in, किंवा 02362-228414 मोबा.न. 8591903607, हेल्पलाईन क्रमांक 15100 वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा