सावंतवाडीतील स्नेह पतसंस्था व रोटरी क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा
१४ सप्टेंबर रोजी काळसुलकर हायस्कूलमध्ये आयोजन
सावंतवाडी –
स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडी आणि रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ही स्पर्धा काळसुलकर हायस्कुल, सावंतवाडी येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजक संस्थेतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेचे स्वरूप व गट खालीलप्रमाणे असेल:
1. जुनिअर केजी / शीशु वर्ग १: दिलेल्या चित्रामध्ये रंग भरणे
2. सिनीअर केजी / बालवाडी: दिलेल्या चित्रामध्ये रंग भरणे
3. इयत्ता १ ली ते २ री: विषय – आवडता प्राणी किंवा पक्षी / पावसाळा
4. इयत्ता ३ री ते ४ थी: विषय – निसर्ग / स्वच्छता
स्पर्धकांना कागद आयोजकांकडून पुरविण्यात येईल, मात्र रंगसाहित्य इत्यादी साहित्य स्पर्धकांनी स्वतः सोबत आणावे.
इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे स्नेह नागरी सहकारी पतसंस्था, सावंतवाडी येथे कळवावीत. तसेच स्पर्धेच्या दिवशीही स्थळी नाव नोंदणी करता येईल.
