*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कलियुग*
〰️〰️〰️
बहुअंशी आपुल्याच मनासारखं
काही कधीच इथं घडतच नसतं
हळू हळू त्याचाच सरावच होतो
अन मन सार सत्य कळून चूकतं
आपल वागणं फक्त हाती असतं
इतरांच वागणं आपल्या हाती नसतं
हाच साऱ्या जगाचाच नियम आहे
हे कळतं पण ते कधी वळत नसतं
शहाण्याला फक्त तडजोड करूनच
इथे या जगात जगावं लागत असतं
सद्गुण आणि सात्छिलता व्यर्थ इथे
इथे फक्त धूर्त स्वार्थी असावं लागतं
कलियुगी फक्त संस्कारांची पायमल्ली
प्रेम , जिव्हाळा ओढ इथं काही नसतं
आज जो तो इथं स्वमग्नात रमलेला
त्याच्या लेखी स्वार्थाविना काही नसतं
या जगात फक्त आपणच मुर्ख असतो
बाकी सर्वांच वागणं मात्र योग्य असतं
अंती असतात सारे भोग ते प्राक्तनाचे
कुणा दोष न देता जगणं हाती असतं
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️वि.ग.सातपुते (भावकवी)*
*(९७६६५४४९०८)*
