You are currently viewing काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बैठक

काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बैठक

काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बैठक –

११ सप्टेंबर रोजी डॉ. परशराम पाटील यांची विशेष उपस्थिती

बांदा

सर्व काजू उत्पादक आणि बागायतदार शेतकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की, काजू संदर्भातील विविध मुद्यांवर – जसे की खरेदी-विक्रीची आधारभूत किंमत, थेट बाजारपेठ उपलब्धता, विमा योजना इत्यादी – यावर काजू मंडळ संचालक तसेच अपेडा संचालक मा. डॉ. परशराम पाटील यांच्याशी नुकतीच सविस्तर चर्चा झाली आहे.

या चर्चेच्या अनुषंगाने मा. डॉ. परशराम पाटील स्वतः पुढाकार घेत गुरुवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता, श्री बांदेश्वर सहकारी दूध संस्था कार्यालय, गडगेवाडी, संभाजी महाराज पुतळ्याजवळ, बांदा-दोडामार्ग रोड, बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे उपस्थित राहून काजू उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या, अडचणी, शंका आणि अपेक्षा थेट मांडाव्यात, जेणेकरून येत्या २०२५-२६ च्या हंगामात काजू मंडळाकडून शेतकरीहित निर्णय घेतले जावेत.

तसेच, आपल्या जिल्ह्यातील सुशिक्षित, अभ्यासू आणि अनुभवी काजू उत्पादक शेतकऱ्यांची काजू मंडळ संचालक म्हणून नियुक्ती व्हावी, यासाठीही या बैठकीत शेतकऱ्यांनी आपले विचार व्यक्त करावेत.

🗓 बैठकीचा दिनांक: गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५
🕞 वेळ: दुपारी ०३:३० वाजता
📍 स्थळ: श्री बांदेश्वर सहकारी दूध संस्था कार्यालय, गडगेवाडी, बांदा

💬 तरी सर्व काजू उत्पादक शेतकरी बंधूंनी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे आणि आपल्या हक्कासाठी, भविष्यासाठी, आणि काजू उद्योगाच्या विकासासाठी आपला मोलाचा सहभाग नोंदवावा.

🙏🏼 धन्यवाद.
आमंत्रक: सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी आणि फळ बागायतदार संघ

 

प्रतिक्रिया व्यक्त करा