You are currently viewing कणकवली येथे 37 पदांकरीता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

कणकवली येथे 37 पदांकरीता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

कणकवली येथे 37 पदांकरीता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सुपर ग्राहक बाजार, कणकवली येथे दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह 37 पदांकरीता आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी पदांसाठी आवश्यक पात्रता तपासून सहभाग नोंदवा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे  सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

संगणक ऑपरेटर पदसंख्या-10, पात्रता 12 वी उत्तीर्ण, ITI Copa, पदवी. महिला मदतनीस पदसंख्या- 20, पात्रता 10 वी, 12 वी, पदवी. पुरुष मदतनीस पदसंख्या- 5, पात्रता 10 वी 12 वी, पदवी. सुरक्षा रक्षक (पुरुष) पदसंख्या- 2, पात्रता 10 वी, 12 वी, पदवी.

            इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस सुपर ग्राहक बाजार कार्यालय, तेलीआळी, पंचायत समितीसमोर, कणकवली येथे सकाळी 10 वाजता उपस्थितीत राहावे. ही एक उत्तम रोजगार संधी असून, स्थानिक युवक – युवतींनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा