सावंतवाडी
जम्प नेटवर्कच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेले “सेट-टॉप-बॉक्स” सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला महत्त्वाचा दुवा ठरतील, असा विश्वास सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.
येत्या महिन्याभरात सावंतवाडी शहरात आणि लगेच या काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही लोकांना फ्री वाय फाय, तर अन्य लोकांना एक रूपयात प्रती तास नेटची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे याचा फायदा येथील विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होईल, असे त्यांनी सांगितले. जम्प नेटवर्कच्या माध्यमातून देण्यात येणा-या सेट टॉप बॉक्सचे वितरण आज श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.