You are currently viewing ऐटदार मयुर

ऐटदार मयुर

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

🦚🦚ऐटदार मयुर🦚🦚

🪻🪻🪻🪻🪻🪻🪻

 

मेघाच्छादित अवकाशी

पांघरली धुक्याची चादर,

हिरव्या निळ्या डोंगरी

धुक्याचा हलकासा थर.

 

हरित पोपटी पायर्यांचा थर

त्यात झोपड्यांचे वसे गाव

दिसे किती दृश्य ते सुंदर

हिरवाई मिरविते खाते भाव.

 

ऐटीत, उंचतपकिरी टेकडीवर

नीळी मान उंचावून टेहाळित,

मुकुटीतुरा,उभा झोकात मयुर

पाठीवर निळे, चंदेरी चिलखत.

 

मोरपिशी, निळ्या चाॅकलेटी

डोळ्यांचीनक्षी ,हिरव्यपिसारी

झोकून,खुलूनउलगडल्या लटी

सृष्टीसौंदर्य नजरेत साठवे स्वारी

 

🦚

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

प्रतिक्रिया व्यक्त करा