*महाळुंगे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी श्री. जिवाजी राणे यांची निवड*
देवगड –
महाळुंगे ग्रामपंचायत यांची सर्वसाधारण सभा आज दि. ८/७/२५ रोजी सरपंच संदीप देवळेकर यांच्या अध्यक्षते खाली पार पडली या सभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समिती महाळुंगे च्या अध्यक्ष पदी श्री जिवाजी मारुती राणे यांची एकमताने निवड करण्यात आली, जिवाजी राणे हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून उत्कृष्ट असे भजनी बुवा आहेत त्यांच्या निवडीने ग्रामस्थमध्ये आनंदी वातावरण आहे त्यांच्या निवडीच्या वेळी सरपंच संदीप देवळेकर, ग्रामसेवक आबा हिरवे, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष प्रकाश राणे, सोसायटी चेरमन सुरेश राणे, दीपक परब, प्रशांत राणे, सुमित राणे, अमोल राणे, सुभाष नवले, रवींद्र सावंत, सुवर्णा घाडी, आकांशा राणे, रेश्मा घाडी, भक्ती घाडीगावकर आदी उपस्थित होते

