You are currently viewing फोंडाघाटमध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष; लाखो रुपयांची आतषबाजी आणि स्वच्छतेचा जागर

फोंडाघाटमध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष; लाखो रुपयांची आतषबाजी आणि स्वच्छतेचा जागर

फोंडाघाटमध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष; लाखो रुपयांची आतषबाजी आणि स्वच्छतेचा जागर

फोंडाघाट (प्रतिनिधी) –

फोंडाघाट येथे श्री. गणेश विसर्जनाची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडली. रात्री ८ वाजेपर्यंत धुमधडाक्यात लाखो रुपयांची फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात हवेली नगर येथून झाली. ट्रकवर डॉल्बी साउंडच्या गजरात, सर्व भक्तगण “श्री गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” च्या जयघोषात नाचत होते.

फोंडाघाट ग्रामपंचायतीने मिरवणुकीचे अतिशय उत्तम नियोजन केले होते. श्री गणेश घाटावर गेल्यावर्षी बसवलेला लोखंडी मांडव यावर्षी पावसापासून संरक्षण देणारा ठरला. घाटाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली होती. या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री. अजित नाडकर्णी यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत आणि श्री धर्माधिकारी यांच्या स्वयंसेवक भक्तांनी घाटावर रिकामे ड्रम ठेवून निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती. यामुळे स्वच्छतेचा सकारात्मक संदेश सर्वत्र पोहोचला. सर्व भक्त भगव्या टोप्या घालून सहभागी झाल्यामुळे परिसर भगवामय झाला होता.

प्रसाद वाटपाची जबाबदारी यंदाही श्री. पिंटू पटेल यांनी पार पाडली. गेली अनेक वर्षे ते ही सेवा अतिशय निष्ठेने करत आहेत. विसर्जनानंतर मात्र बाजारपेठ स्तब्ध झाली होती. कारण मागील अकरा दिवस सुरू असलेल्या आरत्या व भजनांमुळे निर्माण झालेले प्रसन्न वातावरण विसर्जनासोबतच थांबले, याची खंत अनेक भक्तांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

॥ श्री गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ॥

— श्री. अजित नाडकर्णी, संवाद मिडीया

 

प्रतिक्रिया व्यक्त करा