You are currently viewing तेर्से बांबर्डे, काजळवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव दत्तात्रय डीचोलकर यांचे निधन

तेर्से बांबर्डे, काजळवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव दत्तात्रय डीचोलकर यांचे निधन

कुडाळ (तेर्से बांबर्डे) :

तेर्से बांबर्डे, काजळवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव दत्तात्रय डीचोलकर (92) यांचे मंगळवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले. सुरुवातीला ते रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे काही वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात मूळदे, तेरसेबांबर्डे येथील प्राथमिक शाळेतही त्यांनी अध्यापनाची सेवा बजावली. पदोन्नतीपर शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात काम केले. तेथून वेंगुर्ले, मालवण व कुडाळ येथे विस्तार अधिकारी या पदावर काम करून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांना शेती, बागायतीची सुद्धा फार आवड होती. त्याकाळी त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून एम.ए. पदवी प्राप्त केली होती.

त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तेर्से बाबर्डे काजराळवाडी येथील प्रगतीशील शेतकरी संजय उर्फ गोटू डीचोलकर, खानोली येथील प्राथमिक शाळा क्र. 1 च्या शिक्षिका राखी चव्हाण तसेच मीनाक्षी चव्हाण (मालवण) यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा