*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गणेश वंदना*
वक्रतुंड महाकाय, मंगलमुर्ती गणराया
तू सुखकर्ता तू दुखहर्ता, गणपती बाप्पा मोरया ॥धृ॥
एकदंत भालचंद्रा, गजमुख तू गजानना
मूषक नायक बल्लाळेश्वर, गणपती बाप्पा मोरया ॥१॥
विघ्नहर्ता विघ्नविनाशक, मोरेश्वरा तू गणाधीशा
प्रथम वंदितो तुज मी गणेशा, गणपती बाप्पा मोरया ॥२॥
लंबोदर तू गौरी नंदना, सिद्धिविनायक गणनायका
पुजन करूनी करितो नमन गणपती बाप्पा मोरया ॥३॥
गिरिजात्मज तू महागणपती, धुम्रवर्ण तू विनायका
पुष्प वाहुनी आरती करितो, गणपती बाप्पा मोरया ॥४॥
कवी:- *चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*(चांदवडकर) धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
