You are currently viewing गुरू माझा शिल्पकार

गुरू माझा शिल्पकार

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुरू माझा शिल्पकार* 

 

गुरू माझा शिल्पकार

गुरू निस्वार्थी आधार

बाल मनात कोरतो

संस्काराचे सुविचार

 

प्रकाशच ज्ञानगुरू

देई शिष्यास आकार

पैलू पाडतो जीवना

गुरू एक शिल्पकार

 

आहे अथांग सागर

वाट ज्ञानाची दाखवी

पाझरून शिक्षणात

मुल्ये तत्वाची फुलवी

 

कास यशाची दिसते

सदा गुरूंच्या छायेत

वाट मिळे शिक्षणाची

त्यांच्या शिक्षण कलेत

 

शिक्षा सत्याची देताना

सदा ज्ञानबोध येई

गुरू माझे कल्पतरू

विकासाच्या गावी नेई

 

गुरू प्रकाशीत सुर्य

ज्ञान धडे गिरवतो

जीवनाच्या वाटेवर

ज्ञान फुले फुलवतो

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगीरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा