“सावधान काम चालू आहे” गेल्या आठ दिवसापासून सूचनाफलक जैसे थे दोन दिवसात काम चालू न केल्यास आंदोलन – रवी जाधव
सावंतवाडी
कोलगाव आय टि आय सावंतवाडी कुडाळ हायवे गेल्या कित्येक दिवसापासून खचला आहे त्याच्या दुरुस्तीसाठी आठ दिवसा पासून “सावधान काम चालू आहे” असा सूचना फलक लावण्यात आला आहे परंतु काम पूर्णपणे बंद आहे एकतर सदर हायवे अरुंद असल्या मुळे या हायवेवर अपघात होत असतात आणि रस्त्याच्या मध्यभागी चिरे-दगड व ड्रम लावून ठेवल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बिनधास्त आहे.
येत्या दोन दिवसात रस्त्याचं काम सुरू न केल्यास बांधकाम विभागाच्या समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी दिला आहे.
