रत्नागिरी :
भाजपा नेते विशाल परब यांनी आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट घेतली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या घरी श्री. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी श्री. परब यांनी विशेष दौऱ्याचे आयोजन केले होते.
या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी ॲड. अनिल निरवडेकर हे देखील सोबत होते. श्री. परब आणि ॲड. निरवडेकर यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना पुष्पगुच्छ अर्पण करून उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
या भेटीदरम्यान उत्सवी वातावरणात सौहार्दपूर्ण संवाद साधला गेला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, श्रद्धा व एकात्मता जपली जाते, यावर चर्चा झाली. तसेच जिल्ह्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
ही सदिच्छा भेट जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या पारंपरिक वातावरणात जनतेला दिलासा व सकारात्मकतेचा संदेश देणारी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
