*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नाद मुरलीचा…*
*नाद* मुरलीचा येता कानी,
हरखून गेली राधा राणी!
कृष्ण सख्याची चाहूल येता,
नदी तिरी राधा गेली झणी!…१
कदंब वृक्षावरती होती,
स्वारी बसली,मुरली हाती!
चेहऱ्यावर खट्याळ हासू,
पाही राधेची निस्सीम प्रीती!..२
बावरलेली राधा गौळण,
शोधीत होती कृष्ण पाऊले!
खूण प्रेमाची दिसता डोळा,
बासरी सूर मनी हासले!..३
मोरपीस उजळले शिरी,
राधेचे डोळे चकीत झाले!
राधा राधा *नाद* तो उरला,
शाम सुंदर डोळा दिसले!..४
उज्वला सहस्रबुध्दे,

