कणकवली :
सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवलीचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. राणे यांची घेतलेली ही औपचारिक भेट होती.
या भेटीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः पावसाळ्यात तसेच आगामी सणासुदीच्या काळात रस्ते सुरळीत व सुरक्षित स्थितीत राहावेत, याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. त्यांनी विभागातील अधिकाऱ्यांनी जनतेच्या अडचणींना त्वरित प्रतिसाद द्यावा व प्राधान्याने कामे पूर्ण करावीत, असेही स्पष्ट केले.
पालकमंत्रींच्या या मार्गदर्शनाचा कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांनी स्वागत करत त्यांना विभागाच्या कामकाजाचा आढावा दिला. त्यांच्या स्वागतासाठी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
