You are currently viewing निवृत्त शिक्षिका सौ. रजनी जाधव यांचे निधन

निवृत्त शिक्षिका सौ. रजनी जाधव यांचे निधन

सावंतवाडी :

मुंबई बोरिवली येथे दीर्घकाळ शिक्षक म्हणून कार्यरत राहिलेल्या आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या निवृत्त शिक्षिका सौ. रजनी मोहन जाधव यांचे वयाच्या ८२व्या वर्षी सोमवारी (दि. १ सप्टेंबर २०२५) सकाळी ११.५० वाजता सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

सौ. जाधव या अत्यंत प्रेमळ, सुस्वभावी व कर्तव्यनिष्ठ शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. अध्यापनात त्यांनी दाखवलेली तळमळ आणि विद्यार्थ्यांशी ठेवलेला आपुलकीचा सहवास यामुळे समाजात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. संवाद मिडिया न्यूज चॅनलच्या ब्युरो चीफ विभावरी परब यांच्या त्या मावशी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा