You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांचे कुटुंबासह वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन

पालकमंत्री नितेश राणे यांचे कुटुंबासह वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन

मच्छीमार बांधवांसह राज्याच्या सुख-समृद्धीसाठी नितेश राणे यांची बाप्पा चरणी मनोकामना..

मुंबई :

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी ऋतुजा राणे व मुलगा निमिष राणे यांच्यासोबत त्यांनी श्री गणरायाची आरती करून दर्शन घेतले.

गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, बळीराजाच्या मेहनतीला योग्य फळ मिळावे, मच्छीमार बांधवांचे जीवन अधिक सुखी व समृद्ध व्हावे, तसेच राज्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य, आयुष्य मंगलमय व्हावे अशी भावपूर्ण प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली.

यावेळी वर्षा निवासस्थानी झालेल्या या दर्शन प्रसंगी कुटुंबासह आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धीसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्पही व्यक्त केला. गणेशोत्सवामुळे समाजात एकोपा, श्रद्धा आणि भक्तीचे वातावरण निर्माण होत असून या पर्वातून सकारात्मक उर्जा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

गणेशभक्तीचा उत्साह, कुटुंबासह घेतलेले बाप्पाचे दर्शन आणि जनकल्याणाची प्रार्थना यामुळे मंत्री राणे यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा