*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गौर आली माहेराला*
———————————————————-
शांती, समृद्धी सोबती
आनंदाला वाटायाला
सोन पावलांनी दारीं
गौर आली माहेराला
स्वागताला लेकीच्या या
दिंड्या दारीच्या सजल्या
रेशमाच्या पायघड्या
केशरात भिजवल्या
लेक माहेराला येता
चैतन्याने झुले सारे
अंगणात भेटायाला
थोडे थंबकले वारे
कौतुकाने लेकीसाठी
पाच पक्वान्न रांधले
नथ, बुगडी,मोतीमाळ
अंगावरी चढवले
आया बाया लेकीसवे
झिम्मा,फुगड्या खेळती
गोड गोड गाणी गात
रात सारी जगवती.
सासराला अंती जाणे
सारे रिवाज हे जुने
लेकीच्या जाण्याने मग
घर होईल सुने, सुने
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे

