You are currently viewing श्री गजानन महाराज

श्री गजानन महाराज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्री गजानन महाराज*

 

श्री गजानन महाराजांना करू वंदन

लोकोद्धारार्थ अर्पिले स्वामींनी जीवनIIधृII

 

माघ वद्य सप्तमी गुरूंचा आहे प्रकट दिन

जगातील कलह दूर करून देती आनंद

शेगावचे संत निर्मिती जीवनी चैतन्यII1II

 

आज उत्तम सुदिन आनंदाला ये उधाण

संतांच्या वाणीनं कस्तुरी लिला कृपेचा सुगंध

षड्रिपुंवर नियंत्रण संतांची शिकवणII2II

 

गजानन महाराज विजय ग्रंथ बावन्नी स्तोत्र

दंग होती वाचन मनन संकीर्तन श्रवणांत

भक्तीचा आनंद लुटती सर्व भक्त जनII3II

 

पिठले भाकर अंबाडी भाजी कांदा नैवेद्य

महाराजांची आवड गरीब भक्तांची जाण

त्रिकाल ज्ञानी गुरूं भक्तीने होते निर्मळ मनII4II

 

निसर्गावर सत्ता असणारे ब्रह्मांडनायक

योगीराज असती वाचा सिद्ध लीला अगाध

भेदाभेद टाळून चिंतिती सर्वांचे कल्याणII5II

 

गण गण गणांत बोते दिला बीज मंत्र

सर्वांचा केला उद्धार गुरु महामंत्रानं

शिकवती शोधावा ईश्वर स्वहृदयांत II6II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा