*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित श्री गजानन महाराज शेगांव समाधी दिनानिमित्त अभंग रचना*
|| संजीवन समाधी सोहळा ||
भाद्रपद शुद्ध | पंचमीचा दिन|
गुरू गजानन| समाधिस्त||—–१
गुरु प्रगटले|भक्तांच्या स्वप्नात|
समाधीचे वृत्त| कथियेले ||——२
सडा संमार्जन| करी रस्त्यावरी |
मनोभावे नारी|गोमयाचे||——–३
रथयात्रा चाले| रात्री मार्गावर |
रांगोळ्या सुंदर| रेखीयेल्या||—-४
भक्तांचा मेळावा |जमला अपार|
भजन सुस्वर |दिंड्या चाले||—–५
भक्तजन रथी |पैसे उधळती |
वाटे खिरापती |मोदभरे ||——–६
रात्रभर चाले | गुरूचा सोहळा |
मोद हाआगळा |शेगांवी हो ||—-७
उत्तराभिमुख |मूर्ती ही साजिरी |
अभिषेक वरी | केला असे ||—८
बंद केले द्वार | लावूनी या शीळा |
समाधी सोहळा |संपन्नला ||—–९
गुरू गजानन| लिहविते झाले |
भाग्य हे फळले | मंजिरीचे||–१०
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.
मो.नं. 7020757854
