*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पहारा … निरागस फुलाचा ..!*
फुलाचा कोमल तुकडा
ह्दयांत माझ्या दडला आहे
तोच आता माझ्यावर
जागत पहारा देत आहे ..!
जखमा होत गेल्या
हळदीचा हात नव्हता
निरागस फुलाचा तुकडा
घाव झाकत होता..!
माझ्या ओळखीच्या खुणा
तोच… पहारेकरी जपत होता
काही चमकल्या काही विझल्या
काही तो.. लपवत होता ..!
त्याच्या पहा-याविना
आता कसा जगू मी आयुष्याशीअडकलेला जीव कसा हद्दपार करू मी ..!
तोच फुलाचा तुकडा
आजही सांभाळतो जुन्या खुणा
त्यानेच गोंजारलं जागवलं! वाटतं
मीच होतोय की काय! यातून उणा
बाबा ठाकूर
