You are currently viewing श्रीगणेशार्पणमस्तु🌺🌺

श्रीगणेशार्पणमस्तु🌺🌺

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रीगणेशार्पणमस्तु🌺🌺*

 

 

जयदेवा जयदेवा

जय गणपती बाप्पा

श्रीगणेशा सौख्यदाता

तूच विघ्नहर्ता बाप्पा

 

तूज वाचुनि आम्हास

संकटमुक्ती न मिळे

तुझीच कृपा असता

सौभाग्य ते फळफऴे.

 

चंदन चर्चित उटी

सुगंधित, गौरवर्णे

दिसे साजरे गोजिरे

रत्नजडित सुवर्णे.

 

अलंकारे विलसते

जपापुष्प दुर्वांकुर

रंग फुलांनी सजते

कंठाते मौक्तिकहार.

 

जय सुमंगलमूर्ती

असशी तू सुखकर्ता

ओवाळू कर्पुरारती

तू सर्व दुःख हरता

 

चरणी स्वर्ण पैंजण

प्रियमोदक अर्पण

नतमस्तक होऊनि

देवा मी तुज शरण.

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

प्रतिक्रिया व्यक्त करा