You are currently viewing नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप सुरु

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप सुरु

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप सुरु

सिंधुदुर्गनगरी

 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत नोंदीत जिवित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटपाची प्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु करण्यात आली असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी दिली आहे.

गृहोपयोगी संच प्राप्त करुन घेण्यासाठी बांधकाम कामगाराने ऑनलाईन पध्दतीने  https://hikit.mahabocw.in/appointment या लिंकवर जाऊन अपॉईंटमेंट घेताना वितरण केंद्र निश्चित करुन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्राची वितरण क्षमता 500 इतकी असेल, वितरण दिनांक 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत (शासकीय सुट्या) वगळून खेले ठेवण्यात आलेले आहे, आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल. गृहोपयोगी संच हे पूर्णपणे विनामूल्य देण्यात येणार आहे. सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा