You are currently viewing कुडाळमध्ये गुटखा प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला जिल्हा न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता

कुडाळमध्ये गुटखा प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला जिल्हा न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता

कुडाळमध्ये गुटखा प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला जिल्हा न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता

कुडाळ

कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा बाळगुन होलसेल विक्रीता आरोपी निलेश प्रकाश कांबळी याची याची दिनांक २८/०८/२०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्री. डॉ. सु. मा. देशपांडे यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला. आरोपीच्या वतीने तर्फे ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जामिनावर मुक्तता केला तसेच ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव, व ॲड. सुयश गवंडे यांनी काम पाहिले.*
कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजिष्टर नं. २७७/२०२५ चे कामी आरोपी यांचेवर भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल झालेला असून आरोपी यांना दिनांक २२/०८/२०२५ रोजी अटक करून दिनांक २३/०८/२०२५ रोजी कुडाळ (पदभार वेंगुर्ला) येथील मे. न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने दिनांक २५/०८/२०२५ रोजीपर्यंत आरोपी यांची पोलीस कोठडीत रवानगी केलेली आहे.
२) सदर गुन्ह्याची हकीगत अशी कि, पान मसाला व सुगंधी तंबाकू अर्जदार यांच्या ताबे कब्जात बाळगल्या स्थितीत मिळून आल्यामुळे अर्जदार विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला.
सदरचा गुन्हा सेशन ट्रायबल असल्या कारणाने त्या गुन्ह्याच्या कामी आरोपी तर्फे ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी जिल्हा न्यायालयात दिनांक २५/०८/२०२५ रोजी दाखल केला व त्याची सुनावणी २८/०८/२०२५ रोजी झाली. मे न्यायालया समोर झालेला युक्तिवाद मे. न्यायालयाने ग्राह्य मानून व दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार करून आरोपीला योग्य त अटी-शर्तीवर व रक्कम रु १५ हजार रक्कमेच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव, व ॲड. सुयश गवंडे यांनी काम पाहिले

प्रतिक्रिया व्यक्त करा