वेंगुर्ला :
भाजप युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले येथील दिव्यांग बांधवांच्या भजनी मंडळाला श्री गणेश पूजेचे साहित्य भेट दिले.
या कार्यक्रमात भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, प्रकाश वाघ, संजय लोणकर, समीर नाईक, अरविंद आळवे, शेकर आळवे, बाबुराव गावडे, सुधीर गवस, दिंगार ढवळी, अर्जुन राजको, नंदा सावंत, योगेश शिंगाडे आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या गणेशोत्सवाची तयारी अधिक उत्साहाने होणार आहे.

