*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, कथाकार, सामाजिक कार्यकर्ती अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गणपत बाप्पा*
गणपती बाप्पांचं
झालं आगमन
दाही दिशांना
आनंदाचे उधाण
टाळ,मृदंग,वीणा
भजन, कीर्तन
बाप्पाला नैवेद्य
पंच पक्वान्न
गणेश उत्सवात
धार्मिक वातावरण
राष्ट्रीय एकात्मता
सद् भावनांनी भरते मन
उत्सवात सांस्कृतिक
कार्यक्रमांचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या कला
गुणांचे दर्शन
भारतीय संस्कृतीची
मिळते माहिती
गुण्यागोविंदाने गातो
श्री गणेशाची आरती
सुखी ठेवा बाप्पा
तुम्ही सर्वांना
आनंद सर्वांना
होई आपलं दर्शन घेतांना
अनुपमा जाधव

