सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून 4 सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
सावंतवाडी :
सालईवाडा गणेश मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे “मोफत आरोग्य तपासणी शिबीर ” आयोजित करण्यात आले आहे. यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीच्या सहकार्याने 4 सप्टेंबर रोजी स. 9.30 ते 11.30 वा. याच आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातील लाभार्थीना मोफत रक्तदाब आणि रक्त तपासणी अंतर्गत हिमोग्लोबिन आणि रक्तातील साखर तपासणी करण्यात येणार आहे.
तसेच शिबिरातील गरजूंची मोफत उपचाराची सोय ही महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना एकत्रित अंतर्गत यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडी येथे केली जाणार आहे. या शिबिराचा लाभ परिसरातील गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

