You are currently viewing गणराय आगमन

गणराय आगमन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गणराय आगमन*

 

चौसष्ठ कलांचा तु अधिपती

प्रथम नमन तुज गणपती

 

रिद्धी सिद्धी तुझ्या भोवती

उभ्या दोघी तव सेवेशी

 

आरास मखमली शोभते

बाजुस झुंबर डौल डोलती

 

लक्ष दिव्यांच्या लावून माळा

भक्त आरती चरणी गाती

 

चंदन गंधित धुप आरती

रत्नजडीत हा मुकुट माथी

 

भाळी कुंकुम टीळा शोभती

रत्न दर्भ कमळे हाती

 

वक्रतुंड तु गौरीनंदन

चरणी अर्पु तुझीया सुमन

 

सिंहासनी बैसला मोरया

मोदक ताटी प्रसाद घेऊ या

 

चरणी नैवेद्य दाखवूया

सगळे मिळुनी मग खाऊया

 

धुप दीप नैवैद्य आरती

ताटी सुंदर फुले शोभती

 

भाद्रपदी तव महिमा मोठा

आनंदाला नाही तोटा

 

अष्ट गंध हा लावुन माथी

प्रेमभरे गाऊ तव आरती

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा