*लेखक कवी पत्रकार ॲड रुपेश पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिव कृपेने*
हरतालिका व्रत आले
शिव शंभूंनी वचन हे दिधले
शिव शक्तीचा विवाह ठरला
पार्वतीला आनंद झाला
नियतीने इथे खेळ रचिला
श्री विष्णूचे स्थळ हे येता
हिम राजाने शब्द हा दिधला
गौरी कन्य देतो तुजला
प्राण सखीने मग पार्वतीला
वनी घुवी घेऊन जाता
हरतालिके चे व्रत हे केले
शिवलिंग ते जागृत झाले
हिम राजा तो वनी हा आला
गौरी संगे कैलासी केला
विवाह जुळला शंकर हसला
शिव गणांचा मेळा सजला
असे व्रत हे पावन झाले
सखी पार्वती पूजन केले
पती-पत्नी चे हे पवित्र नाते
मिळेल प्रिय वर शिव कृपेने
गीतकार रुपेश पवार

