*ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांची धनगर समाज बांधवांसहित महावितरण वरती धडक*
*जुने मीटर कल्पना न देता का बदलले, भरमसाठ बिले येतात ते का याबाबत विचारला महावितरणाला जाब*
*तालुक्यातील धनगर समाज बांधवांना गृहीत धरू नका… गणपती, दसरा सणाला धनगर वस्ती मधील लाईट खंडित होता कामा नयेत याची दक्षता घ्या नवलराज काळे यांचे संबंधित विभागाला सूचना*
*वैभववाडी—* वैभववाडी तालुका महावितरण कार्यालय यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडल्या ते त्यांच्या निवेदनाच्या द्वारे निदर्शनास आणून देण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष श्री नवलराज काळे यांनी पुढाकार घेतला. खांबाळे धनगरवाडीतील समाजबांधवांचे लाईटचे मीटर कोणताही अर्ज कोणतीही मागणी नसताना काही मीटर बदलण्यात आले ते का बदलले गेले आहे बदललेले मीटर पुन्हा होते तसे बदलून द्यावेत, व दैनंदिन लाईट बिलामध्ये जो बदल झालाय तो पूर्वरत करावा अशा मागणीचे निवेदन आज महावितरण कार्यालयाला सुपूर्त करण्यात आले.
यावेळी कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या समवेत वैभववाडी तालुका धनगर समाज महासंघाचे नेते, गंगाराम उर्फ बाबू आडुळकर वायंबोशी, महासंघाचे तालुका सल्लागार दाजी बर्गे, महासंघाचे सदस्य बाबाजी देसाई,रमेश बर्गे,गंगाराम उर्फ बाबू आडुळकर,G.R. देसाई,संतोष शेळके, संजय बर्गे, सविता बर्गे,चंद्रकांत बोडेकर, रामचंद्र शेळके, शंकर शेळके, श्रीम.सुनंदा शेळके, नाना शेळके, महेंद्र बोडेकर व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन देताना च्या बैठकीमध्ये जुने मीटर कल्पना न देता का बदलले गेले असे सांगितले असता ते खराब झाले असल्यामुळे बदलले असे कारण संबंधित अधिकारी देत होते यावेळी आपण स्पष्ट खोटं बोलत आहात खराब झाला असता तर एखाद दुसरा झाला असता सगळ्यांचेच मीटर का बदलले गेले. काही मीटर धारकांनी आपल्याकडे मीटर बंद पडले म्हणून अर्ज केले होते त्यांचा बदलला गेला नाही आणि त्यांचे अर्ज नाही त्यांचेच तुम्ही बदललात. म्हणजे हा तुमचा डाव होता तुम्ही समाजाला गृहीत धरून चालता यापुढे असे चालणार नाही अशा सज्जड दम संबंधित अधिकाऱ्याला श्री काळे यांनी दिला. या ठिकाणी जे जीर्णपोल झाले ते बदलण्याची कार्य तत्परता आपण केली पाहिजे होती परंतु ज्या गोष्टीची मागणी नाही त्या गोष्टीच आपण उचलून धरता आणि करता याचा अर्थ काय समजायचा.. तुम्हाला समाजाला कोण वाली नाही असं वाटतंय का? तर तो तुमच्या गैरसमज असेल आमचा समाज जागृत आहे आणि यापुढे जागृत राहील त्यामुळे गृहीत धरून चालू नका ज्या काही गोष्टी शासनाने अमलात आणलेले आहे त्याला पूर्णपणे आमच्या समाजातील जागृत ग्रामस्थ सहकार्य करतील परंतु ही कुठली तुमची पद्धत डायरेक्ट कोणताही मागणी अर्ज नसताना कोणतेही विनंती नसताना तुम्ही मीटर बदललात ज्या ठिकाणी मीटर बदलायची मागणी होती ते मीटर न बदलता चांगले मीटर बदलता आणि आम्हाला बंद किंवा बिघाड झालेले मीटर बदलले म्हणून सांगता हे पूर्ण चुकीच आहे संबंधित विभागाचे जे प्रमुख अधिकारी असतील त्यांच्यासोबत आमची बैठक करून द्या आम्ही त्यांच्याशी बोलू आणि पुढील मार्ग आणि भूमिका ठरवू असे काळे म्हणाले. यावेळी गंगाराम उर्फ बाबू अडुळकर यांनी देखील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर जिथे सहकार्याची भूमिका आहे तिथे नेहमीच आम्ही महावितरण विभागाला सहकार्य करतो परंतु काही ठिकाणी तुमचं चुकतंय त्या ठिकाणी चुकीचं म्हणणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने जर तुमची चुकीच व गृहीत धरून समाजाला वेठीस धरण्याचे काम तुमच्याकडून झालं आणि अशी वागणूक यापुढे दिसली तर निश्चितपणाने लोकशाही मार्गाचा अवलंब करू असे श्री नवलराज काळे व उपस्थित समाज बांधवांनी सांगितले.
यावेळी नवलराज काळे पुढे म्हणाले आता गणेश चतुर्थी व पुढील घटस्थापना नवरतन दसरा या सणाला नेहमीच तुमच्या लाईट बंद होत त्यांच्यात बिघाड होत असतो. याकडेही तुम्ही लक्ष ठेवणे गरजेचे आहे सणासुदीला लाईट जाणं हा प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करा संबंधित वायरमेन यांना तशा प्रकारच्या सूचना आपण द्याव्यात.
1990 सालाच्या आधीपासून काही लोखंडी विद्युत पोल जमिनीत अजून तसेच उभे आहेत ते पोल जीर्ण झालेत. जंगलातल्या झाडी झुडप्यातून तेव्हा पोल घेऊन नंतर वस्ती वरती लाईटीची सुविधा केलेली आहे. आता काही अडचण निर्माण झाल्यास त्या पोलावरती चढण्यास सुद्धा शक्य होत नाही, किंवा त्या पोलापर्यंत पोहोचणे देखील शक्य होत नाही. अशा ठिकाणी चा सर्वे करून धनगर समाज वस्ती वरती आता नवीन नवीन रस्ते झालेले आहेत त्या ठिकाणी जंगलातून गेलेल्या विद्युत वाहिन्या चेंज करून रस्त्याने घेण्यासाठीचा नवीन प्रस्ताव तयार करा व तो मंजूर करून ज्यांना हे जीर्ण झालेले पडायला आलेले जंगलात असलेले विद्युत पोल ताबडतोब बदलून घ्या ज्या मागण्या आहेत त्या पहिल्या पूर्ण करा जिथे मागणी नाही त्या गोष्टींमध्ये हात घालून नका आणि धनगर समाजाला गृहीत धरून चालू नका अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना श्री नवलराज काळे यांनी दिल्या.
यावेळी मीटर बदलले याची कारणे द्या बाबतचे निवेदन महासंघाच्या वतीने देण्यात आले. यावेळी वरील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
