You are currently viewing असलदे तावडेवाडी पियाळी नदीचे पाणी गढूळ ब-याच गावांना आरोग्यास हानिकारक…

असलदे तावडेवाडी पियाळी नदीचे पाणी गढूळ ब-याच गावांना आरोग्यास हानिकारक…

संदेश पारकर झाले आक्रमक नदीची केली पाहणी, सोमवारी घेणार प्रांताधिकारी यांची भेट

कणकवली

तालुक्यातील नांदगाव, असलदे,कोळोशी व हडपीड, तोंडवली बावशी तसेच कासार्डे या गावात ज्या नदीवरुन पाणीपुरवठा सुरू आहे. या असलदे तावडेवाडी नदीचे पणी गेल्या ब-याच दिवसांपासून पाणी गढूळ झाले असून वरील सर्व गावांमध्ये नदीचे पाणी गढूळ झाले असल्याने नळपाणीही गढूळ झाले आहे. या गावांमध्ये नळपाणी गढूळ असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.याबाबत संबधीत ग्रा.पं.ने पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने या समस्येबाबत शिवसेना नेते संदेश पारकर आक्रमक झाले असून आरोग्याशी खेळू नका, लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न असल्याने संबधीत यंत्रणेने तसेच आरोग्य विभागानेही गांर्भीयाने लक्ष द्यावे या मागणी साठी प्रत्यक्ष आज नदीत उतरून त्यांनी गढूळ पाण्याची पाहणी केली यासंदर्भात संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली तेथील ग्रामस्थांबरोबर सोमवारी प्रांताधिकारी यांची भेट घेवून लेखी निवेदन सादर करणार असल्याचे संदेश पारकर यांनी बोलताना सांगीतले आहे. याबाबत परिसरातील ग्रामपंचायत सरपंच यांनी तहसीलदार कणकवली येथे लेखी पत्र दिले आहे. त्यांनी सदर पत्रात असे नमूद केले आहे की वाळू उपसा करून त्याचा निचरा नदीत सोडले आहे यामुळे सदर पाणी गढूळ झाले आहे.याबात बाजूंच्या गावात वाळू उपसा करण्यात येत असल्याचे समजते पण सदर विषय हा आरोग्याशी निगडित असून नागरीक सदर पाणी पिण्यासाठी वापरले जाते यामुळे आरोग्याशी खेळू नका अशी लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न असल्याने संबधीत यंत्रणेने तसेच आरोग्य विभागानेही गांर्भीयाने लक्ष देवून सदर नदीत सोडण्यापासून संबधीतांना प्रतिबंध करावे अशी भुमीका यावेळी संदेश पारकर यांनी मांडली आहे. योवळी युवा सेना उपतालूका प्रमुख आबू मेस्त्री, नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर, तोंडवली बावशी शाखप्रमुख सुनिल पवार, असलदे शाखा प्रमुख सुरेश मेस्त्री, कोळोशी शाखा प्रमुख संदीप शिंदे, नांदगाव ग्रा.पं.सदस्य अरूण बापार्डेकर, तात्या निकम, रज्जाक बटवाले, रामा निकम, बाळा सातोसे, गौस साटविलकर लक्ष्मण लोके, जांभळे आदी उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा