*गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना घोडगे येथे भेटवस्तू वाटप*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने सोमवार दिनांक 25/08/2025 रोजी घोडगे ग्रामपंचायत येथे सकाळी ठीक 11 वाजता दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग साईकृपा संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर, घोडगे गावचे सरपंच सौ ढवन मॅडम, घोडगे ग्रासेवक अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, संस्था कर्मचारी प्रणाली दळवी मॅडम, हर्षल खरात, विठ्ठल शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत सभारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अनिल शिंगाडे सरानी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. व त्यानंतर भेटवस्तू वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला तीसहुन जास्त दिव्यांग उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला डॉ. कोलते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यातून दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. त्यांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
