You are currently viewing मंथन व एक्सलंट स्कॉलरशिप परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

मंथन व एक्सलंट स्कॉलरशिप परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

मंथन व एक्सलंट स्कॉलरशिप परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

वैभववाडी:-

शैक्षणिक वर्ष 2025 चा मंथन व एक्सलंट ओलंपियाड परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा पीएमश्री दत्त विद्यामंदिर केंद्र शाळा-१ येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वैभववाडी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष मा. सौ श्रद्धा रावराणे, प्रमुख पाहुणे वैभववाडी पोलीस निरीक्षक मा. श्री मनोज सोनवलकर व माधवराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिवदास कदम हे उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये सर्व पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरामधून मुख्याध्यापक श्री शिवदास कदम सर यांनी विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर या स्पर्धा परीक्षेचा कसा फायदा होतो आणि पुढे कोणत्या शासनमान्य स्कॉलरशिप हे विद्यार्थी प्राप्त करू शकतात याबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री सोनवलकर साहेब यांनी या चिमुकल्यांना अतिशय सोप्या भाषेत हसत खेळत शिक्षणातून कशाप्रकारे आपण आपले ध्येय साध्य करू शकतो आणि आयुष्यात कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतो याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. आणि आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये नगराध्यक्षा सौ श्रद्धा रावराणे मॅडम यांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. केशव पाखरे व प्रास्ताविक श्री. राहुल गावडे सर यांनी केले. पालकांमधून श्री राजेंद्र पाटील सर, श्री संतोष मोहिते व श्री महेश ईश्वरकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्री अनिल नारकर, श्री अंबादास चेमटे, श्री कावळे सर, श्री अमोल येणगे, श्री संजय पाटील, सौ ज्योत्स्ना पाटील, श्री अविनाश आवटे, श्री भारत पाटील, सौ केळकर मॅडम, सौ. शितल पाटील, सौ मयुरी शिरढोणे मॅडम, सौ मनीषा सरकटे, डॉ. किरण पाटील, प्रा. सुरेश पाटील , श्री समीर सरवनकर, श्री आर आर पाटील, सौ सोनाली सरवणकर मॅडम इत्यादी शिक्षक वृंद व पत्रकार श्री श्रीधर साळुंखे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजक तथा मंथन परीक्षा समन्वयक सौ स्वप्नाली दिघे मॅडम यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाचे आभार डॉ. अजित दिघे यांनी व्यक्त केले व सर्वांनी अल्पोपहार घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमांमध्ये पुढील गुणवंत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
ईशा समीर सरवणकर (इयत्ता पहिली राज्यात तृतीय), हर्षद दीपक घाटये (इ.पहिली राज्यात चतुर्थ), राजवीर राहुल गावडे (पहिली विभागीय आठवा), अर्णव महेश ईस्वलकर (पहिली विभागीय नववा), श्राव्या सुरज पाटील (दुसरी विभागीय सहावा), इंद्रनील अमोल येणगे (दुसरी विभागीय आठवा), जीविका विलास पाटील (दुसरी विभागीय नववा), भूषण भारत पाटील (दुसरी विभागीय दहावा), राधा किरण पवार (पाचवी विभागीय आठवा), आयुष प्रदीप नाळे (सहावी विभागीय विसावा). केंद्र स्तरावरील विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. कुणाल दिलीप कांबळे (इ. पहिली प्रथम), धैर्य चेतन बोडेकर (पहिली व्दितीय), शार्दुल सुमित धोंडे (पहिली द्वितीय), चैतन्य प्रवीण नेवरेकर (दुसरी प्रथम), आरोही रणजीत सावंत (दुसरी द्वितीय), सिया संतोष मोहिते (दुसरी द्वितीय), शुभ्रा प्रभाकर सावंत (दुसरी तृतीय), विराज राजेंद्र पाटील (तिसरी प्रथम), सानवी नारायण दळवी (तिसरी द्वितीय), अथर्व नारायण सुलेभावी (तिसरी तृतीय), प्रतीक दीपक घाटये (चौथी प्रथम), रोझान गुवार काझी (चौथी द्वितीय), संचिता अनंत कदम (चौथी द्वितीय), तनिष्का धखलशेठ सरवणकर (चौथी तृतीय), वेदिका अंबादास चेमटे (चौथी तृतीय), अंश संजय आडे (पाचवी प्रथम), गौरांग प्रशांत धवन (पाचवी द्वितीय), हर्षद विजय बेळेकर (पाचवी तृतीय), समर्थ संदीप गोरे (सहावी प्रथम), एक्सलंट परीक्षेमध्ये स्वामिनी संजय पाटील (दुसरी तृतीय), वल्लभ श्रीपाद घाडी (तिसरी प्रथम), विजिष राजेंद्र पाटील (तिसरी द्वितीय), साई प्रवीण परब (तिसरी तृतीय).

प्रतिक्रिया व्यक्त करा