You are currently viewing तानाजी एकोंडे आणि शामला पंडित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्काराने सन्मानित

तानाजी एकोंडे आणि शामला पंडित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्काराने सन्मानित

*तानाजी एकोंडे आणि शामला पंडित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्काराने सन्मानित*

पिंपरी

कवी, लेखक,संपादक तानाजी एकोंडे आणि शामलाक्षरी काव्य निर्मितीच्या उद्गात्या व प्रकाशिका शामला पंडित-दीक्षित यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पिंपरी चिंचवड महानगरपालिका व कलारंजन सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,रोख रक्कम,ग्रंथ व शाल देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी चाळीस वर्षापेक्षा अधिक काळापासून साहित्यिक आणि सामाजिक सेवा देणारे गुणवंत कामगार व कामगार शिक्षक तानाजी एकोंडे,काव्य प्रकारात नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि ज्यांच्या नावावर १४ पेक्षा अधिक काव्यसंग्रह आणि कथासंग्रह प्रसिद्ध आहेत,अशा कवयित्री शामला पंडित-दीक्षित,५० हून अधिक पुस्तकाचं लेखन करणारे लेखक तुकाराम पाटील, कवी,कथाकार, गझल कार राज अहेरराव,विविध विषयावर संशोधन करणारे डॉ.धनंजय भिसे यांना “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार” प्राप्त झाला.
खासदार श्रीरंग बारणे,विधानपरिषद आमदार उमाताई खापरे,कलारंग सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार अमित गोरखे,माजी आमदार अश्विनीताई जगताप,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर,माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून साहित्यिकांना गौरविले.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, हभप अशोक महाराज गोरे, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर दळवी,गणपत पांचाळ,मनोजकुमार सूर्यवंशी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शाहिरी,पोवाडे,लोकगीते व लोकसंगीत या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद उपस्थित रसिकांनी घेतला.

शामला पंडित-दीक्षित
संपर्क क्र.८२६१८७९०४५

प्रतिक्रिया व्यक्त करा