*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्याचे रंग*
रंग आयुष्याचे
असतात सतत बदलणारे
आकर्षक हसरे
दिसतात…..
नात्यातील रंग
पसरतात थेंब ओळीतून
सुबक त्यातून
रांगोळी…..
आत्मीयतेचा रंग
विरघळून जाता समाजात
आदर जोपासतात
सगळे….
भावभावनांचे रंग
फिकट कधी गहिरे
बदलतात वारे
प्रसंगानुरूप….
पाण्यासारखे नितळ
सामावून सर्व रंगांना
चिंब भिजताना
आनंदात……।।
अरुणा दुद्दलवार

