You are currently viewing ।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ११२ वे
अध्याय – १९ वा, कविता – ४ थी ।।
___________________________
हरी पाटील आले । स्वामी त्यास भेटले । मग ,बुटीला कळून आले । आपले वागणे चुकले ।। १ ।।

बुटी म्हणे, माझे एवढे ऐकावे । पंक्तीत तुम्ही बसावे ।
स्वामींनी सर्वां सोबत भोजन करावे । नसता होईल हसे माझी ।। २ ।।

स्वामींनी बुटीचा मान ठेवला । निघताना बुटी- पत्नीस आशीर्वाद दिला। सद्गुणी पुत्र होईल तुजला । निघाले मग स्वामी भेटण्या राजा रघुजीला ।। ३ ।।

राजाचा पाहुणचार घेतला । गेले रामटेकला । श्री राम दर्शनाला । मग परतले शेगावला ।। ४ ।।

साधू थोर मोगलाईत ।धार कल्याणचे रंगनाथ । भेटती स्वामींना मठात । बोलणी अध्यात्मिक झाली त्यांची ।।५।।

श्री वासुदेवानंद सरस्वती । कृष्णाकाठी यांची महती । हे शेगावी येती । भेटण्या स्वामी गजानना ।। ६ ।।

भेटता एकमेकांना । आनंद होई त्यांच्या मना । असे मोठी साधना । या दोन थोर सत्पुरुषांची ।।७ ।।

स्वामी मठात आले । गजननांकडे पाहिले । आणि त्वरे निघाले । परत जाण्या ।।८ ।।

शिष्य बाळाने हे पाहिले । उत्सुकतेने त्याने विचारले ।
येणे यांचे कसे झाले ?। मार्ग वेगळा यांचा ,तुमच्याहूनी ।।९।।

बाळास स्वामी बोले । ते पाहिजे आपण जाणले । सार सारे यातले । जे स्वामींनी सांगितले ।।१०।।
**************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि. देशपांडे – पुणे.
___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा