You are currently viewing पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर महेंद्रा अकॅडमीकडून “स्पेशल बॅच”

पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर महेंद्रा अकॅडमीकडून “स्पेशल बॅच”

पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर महेंद्रा अकॅडमीकडून “स्पेशल बॅच”

विद्यार्थ्यांनी संधीचा फायदा घ्यावा – महेंद्र पेडणेकर

सावंतवाडी

राज्यात येत्या काळात १५,००० हून अधिक पोलीस पदांची भरती होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, महेंद्रा अकॅडमीकडून सावंतवाडी आणि कुडाळ येथे खास “स्पेशल बॅचेस” सुरू करण्यात आल्या आहेत. या बॅचेससाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्रमुख महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे.

या विशेष प्रशिक्षण वर्गांमध्ये दररोज सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळेत लेक्चर्स आणि ग्राउंड ट्रेनिंग आयोजित करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना होणार असून, वेळेवर तयारी सुरू केल्यास निवडीत यश मिळवणे अधिक सोपे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यात जाहीर झालेल्या भरतीत एकूण १५,६३१ पदांचा समावेश असून, त्यामध्ये पोलीस शिपाई – १२,३९९, चालक – २३४, ब्रॅण्ड्समन – २५, SRPF – २,३९३ आणि कारागृह शिपाई – ५८० पदांचा समावेश आहे.

अधिक माहिती व प्रवेशासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 9022686944 / 7350219093

प्रतिक्रिया व्यक्त करा