*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पोळा*
पिठोरी अवसेला
पोळा सण आला
श्रावणाचा शेवटचा दिन
आनंद घेऊन आला
बैल पोळा सण
साजरा करू चला
चला सजवू बैल जोडीला
आंघोळ घालू वृषभ राजाला
रंग रंगोटी करूनी
शामी मुकूट शोभे शिंगाला
घंटा घुंगरू पट्टा गळ्यात
गोंडे बांधू फुलांच्या माळी घालू
खूरं सजवू पायात चाळ बांधू
शाही झुली अंगावर चढवू
कासरा नवा कोरा हाती घेऊ
पुजा करू पुरणपोळी नैवेद्य देऊ
वाजंत्री वाजवून नाचत डौलाने
घरोघरी गावभर मिरवून येऊ
बैल नाही नुसता
नंदी महादेवाचे वाहन
शाप कुणाचा साहतो
सजा कुठली भोगतो
वर्षभर राबतो
गपगुमान
धन्यासाठी कष्टतो
पोळा सणाला
सर्जा राजा म्हणून मिरवतो
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
7588318543.
8208667477.

