*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निसर्ग*
निसर्ग कोपलाय
हसलाय की रुसलाय
जेंव्हा पाऊस नसतो, तेव्हाही सजीवांच्या जीवाची काहिली
अन अतिवृष्टी होते तेव्हाही नुकसानीची होते उनसावली.
निसर्ग खुशीत असतो तेव्हा
कविता करायला छान वाटते,
पण जेव्हा आपत्ती येते तेव्हा
माणसांची पुरी दाणादाण उडते.
माणूस जरी किती झालामहान
तरी निसर्गाच्या अफाटशक्तीपुढे
तो क्षुल्लकच होतोअगदीलहान
मग तंत्रज्ञानाचेही अडते घोडे.
निसर्ग आनंदात असतो तेव्हा
भरभरुन, आनंदाचे दान देतो
पण जेव्हा त्याचा उद्रेक तेव्हा
क्षणार्धात सारे नाहीसे करतो.
कधी अतिवृष्टीने सारे वाहूननेतो
कधी अवृष्टीने उपासमार होते
कधी वणवा,कधी भूकंप धक्का
कधी लाव्हारसाची नदी वाहते.
आणि जेव्हा खरा सुंदर निसर्ग
मानवाला रमणीयतेने मोहवतो
,तेव्हा कवी त्या निसर्गालाप्रेमाने आपल्या शब्दकाव्यात गुंफतो.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
