*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रेम माझं…जगजाहीर करू दे!!*
झुळुक सुखद वा-याची
कां अशी मंदावली गात्र
सांग सखे तुझ्या मनातलं
अजून तरूण आहे रात्र
माझा दुबळा संयम
कितीही.. जपला जरी
आपल्या प्रेमाचं गुपित
फुटणार …कधी तरी
पापणी उचलून ..बघ जरा मला
गर्द डोळ्यांतील काजळरेखा चोरायची
रेंगाळलेल्या काजळवेड्या.. रात्री
वाट बघायला लावू नको मिलनाची
उषाकिरणांनो अजून थांबा रे जरा
तळमळत तिच्याविना !उजाडली पहाट
रात्र तर… अशीच भरकटत गेली
होतो मी.. सखे तुझ्या गोड स्वप्नांत
माझ्या प्रतिक्षेची लज्जत
अशीच तू राहू दे
आपल्या प्रेमाचं गुपित
मला जगजाहीर करू दे…!!
बाबा ठाकूर
