You are currently viewing गणेश उत्सवाच्या काळात तरी जिल्हा चिकित्सक यांनी रात्रीच्या वेळी अपघात विभागात निदान दोन तरी सिस्टर द्यावेत. – रवी जाधव

गणेश उत्सवाच्या काळात तरी जिल्हा चिकित्सक यांनी रात्रीच्या वेळी अपघात विभागात निदान दोन तरी सिस्टर द्यावेत. – रवी जाधव

गणेश उत्सवाच्या काळात तरी जिल्हा चिकित्सक यांनी रात्रीच्या वेळी अपघात विभागात निदान दोन तरी सिस्टर द्यावेत. – रवी जाधव

फिजिशियनची मागणी करून दमलो निदान पुरेसा स्टाफ तरी द्या.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना यांच्यामार्फत मागच्या वर्षापासून रात्रीच्या वेळी अपघात विभाग मध्ये स्टाफ द्या अशी मागणी करण्यात आली होती परंतु या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाला.
रात्रीच्या वेळी अपघात विभागामध्ये फक्त एकच सिस्टर आणि एक वॉर्ड बॉय असतो.
सात ते आठ रुग्ण एकाच वेळी आले तर त्या एका सिस्टरची खूप धांदल उडते.
काल रात्रीची परिस्थिती पाहिली असता एकाच वेळी पाच रुग्ण आले सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव व लक्ष्मण कदम यांच्या मदतीमुळे त्या रुग्णांना हाताळणे सोपे झाले त्यावेळी ड्युटी बजावत असलेल्या सिस्टरने त्यांचे आभार मानले.
त्या काल रात्रीच्या रुग्णांपैकी गव रेड्याने मारलेला रुग्ण ,सिलिंग फॅन तुटून चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेले दोन रुग्ण, धाप लागून सिरीयस झालेला रुग्ण, मेंदू विकाराचा एक रुग्ण तर गळफास लावून आत्महत्या केलेली एक महिला असे मिळून दोन डेड बॉडी हे सर्व एकाच वेळी आले विचार करा त्यावेळी त्या एका सिस्टरची काय परिस्थिती झाली असेल या सर्व रुग्णांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाचे सदस्य रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी सहकार्य केले तर अचानक संपलेला ऑक्सिजन मुळे रुग्णाच्या नातेवाईकांची खूप धावपळ झाली अशावेळी अशा वेळी रवी जाधव यांनी मोठ्या परिश्रमाने ऑक्सिजन सिलिंडर चालू केले त्यामुळे रुग्णांना त्वरित ऑक्सिजन मिळाला सदर परिस्थिती पाहता माजी नगरसेवक सुदन आरेकर यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली परंतु सदरची परिस्थिती पाहून तेही हतबल झाले. अशावेळी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना सांभाळणे फार कठीण असतं कारण जो तो आपल्या पेशंट कडे लक्ष द्या असं सांगत असतो व नंतर वाद निर्माण होतात परिणामी हॉस्पिटलची बदनामी होती .
मागच्या वर्षा पासून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना यांच्या माध्यमातून फिजिशियन द्या अशी मागणी होत होती परंतु ती मागणी अमान्य करण्यात आली परंतु रात्रीच्या वेळी तरी निदान अपघात विभागामध्ये दोन सिस्टर द्या ही देखील मागणी होत आहे.जर रुग्णांना पुरेशी सेवा मिळत नसेल तर अशा समितीमध्ये काम करायला मूड राहत नाही अशी भावना रवी जाधव यांनी व्यक्त केली. येत्या दोन दिवसात सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांनी अपघात विभागांमध्ये रात्रीच्या वेळी दोन सिस्टर द्यावेत अशी कळकळीची विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्त दाता संघटना यांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा