You are currently viewing बैलपोळा

बैलपोळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बैलपोळा* 🌹

 

सण शेतकऱ्यांचा

पोळा सण उत्सवाचा

बैल माझा दावणीचा

सर्जा राजा आवडीचा

 

न्हावुन माखुन बैला

रंग अंगाला लावु या

पाठीवर झुल नवा

सर्जा राजाला चढवुया

 

शिंगे, हिंगुळ सजवा

टोकी शेम्बया चढवुया

तोडा पितळी घालुन

म्होरकी नवी घालु या

 

सर्जाला माझ्या सजवा

गाव वेशीला फिरवा

ताटी आरती सजुन

नैवेद्य त्याला भरवा

 

त्याज विना सुने सुने

सारे अंगण पसारा

नात्या गोत्याचा नसुन

उभ्या आमच्या संसारा

 

सेवा घराची करतो

कष्टाची भाकरी देतो

तुचं घराचा आसरा

वंदन तुज करतो

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा